Tiger 3 Box Office Collection: टायगर ३ चा बॉक्स ऑफिस वर धमाका

Tiger 3 Box Office Collection: टायगर 3 सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांचा चित्रपटाने धमाकेदार कलेक्शन केले आहे. दिवाळीच्या दिवशी म्हणजे १२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता

Tiger 3 Box Office Collection धमाकेदार बॉक्स कलेक्शन

मनीष शर्मा दिग्दर्शित टायगर 3 ने तिसऱ्या दिवशी देखील धमाकेदार कलेक्शन करत आता पर्यंत 240 कोटींची कमाई केली आहे. यशराज फिल्म च्या ट्विटर अकॉउंट करून हि माहिती देण्यात आली.

टायगर 3 बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 3

सलमान खानच्या या चित्रपटाच्या कमाई मध्ये घट दिसून आली आहे. मंगळवारी अंदाजे या चित्रपटाने ₹42.5 कोटी कमाई केली होती.

जगभरामध्ये सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीसाठी हा सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 241 रुपयांची तर भारतात 180.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. टायगर 3 हिंदी, तमिळ आणि तेलुगू या 3 भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता .

Tiger 3 चित्रपटाने पहिल्या दिवशी 43 कोटीची कमाई केली होत आणि दुसऱ्या दिवशी 58 कोटीची कमाई करत 100 कोटींचा आकडा पार केला आणि दुसऱ्या दिवस अखेर 101 कोटीची कमाई केली होती.

टायगर 3 चित्रपटाबद्दल

टायगर 3 चित्रपटामध्ये सलमान खान कतरीना कैफ आणि इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत आहे तसेच या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि ह्रितिक रोशन यांचा देखील एक छोटासा भाग आहे. 2019 नंतर सलमान खान चा हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ज्याने पहिल्याच दिवशी ₹ 42.30 कोटी कमावले आहेत.

टायगर ३ हा २०१७ मध्ये आलेल्या टायगर जिंदा है चाच पुढचा भाग आहे. २०१७ नंतर हिट झालेला सलमान खानचा हा दुसरा चित्रपट आहे.

टायगर 3 आता तीन दिवसांत कमाईच्या बाबतीत 2023 मध्ये तिसरा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर शाहरुख खानचा ‘जवान’ आणि ‘पठाण’ या चित्रपटाने कब्जा केला आहे, ज्यांनी त्याच्या पहिल्या तीन दिवसांत अनुक्रमेण ₹180.45 कोटी आणि ₹161 कोटी कमाई केली होती.